DONATION TO OUR TRUST IS EXEMPTED U/S 80G OF INCOME TAX ACT IN INDIA
श्री नारंगीकर साहेब यांचे श्री स्वामी समर्थ चरित्र पारायणाचे अध्यायानुसार क्रमाने विडियो पहा
https://www.facebook.com/swami.seva.3/
अध्याय: 1
अध्याय: 2
अध्याय:3
अध्याय:4
अध्याय:5
अध्याय:6
अध्याय:7
अध्याय :8
अध्याय:9
अध्याय:10
अध्याय:11
अध्याय:12
अध्याय:13
अध्याय:14
अध्याय:15
अध्याय:16
अध्याय:17
अध्याय:18
अध्याय:19
अध्याय:20
अध्याय:21
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गण गण गणात बोते
नमस्कार स्वामी भक्तांनो !
आज सकाळी २.०० वाजता मी आलो घरी बहरीनवरून.
सर्वप्रथम श्री. चेतनजी म्हात्रे आणि श्री. महेश कदम ह्यांचे पुन्हा मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले.
वास्तविक आखाती देशात यूएई सोडून अजून एका देशात म्हणजे बहरीन मध्ये अक्कलकोट स्वामींचे पारायणं आणि नामसम्रण होईल असे स्वप्नात सुद्धा वाटले न्हवते.
सुरवात शुक्रवार २४ जानेवारी २०२० रोजी सौ. विनायाताई चेतन म्हात्रे ह्यांचा घरी झाली. जवळ जवळ १५ ते २० अक्कलकोट स्वामी भक्त आले होते. पारायण सकाळी १०.३० सुरु झाले. मला तर थोडे टेन्शन आले होते कारण नवीन देशात पहिल्यांदा पारायण करत आहे. पण जस जसे सुरवात झाली तस तसे नवीन नवीन गोष्टी सुचत गेल्या. घर एकदम स्वच्छ आणि सुंदर डेकोरेट असल्यामुळे घरातील वातावरण खूप प्रसन्न होते. पारायण आणि नामसम्रण पूर्ण झाल्यावर अक्कलकोटचे माहिती मोबाईलचा फोटो द्वारे जास्तीत जास्त स्वामी भक्तांना सांगण्यात आली. जमलेल्या स्वामी भक्तांनी तर लगेच स्वामी भक्त परिवार, बहारीन हा व्हात्साप्प ग्रुप सुद्धा तयार केला आणि बघता बघता २० ते २५ स्वामी भक्त ग्रुप मध्ये आली. हा ग्रुप नक्कीच वाढविण्याचा मी सुद्धा प्रयत्न करणार आहे. नंतर संध्याकाळी ६ नंतर बहारीन दर्शन सुद्धा सुरेख झाले. २०० वर्षापूर्वीचे श्रीकृष्ण मंदिर आणि इतर काही स्थळे पाहण्यात आली. त्यासाठी श्री. महेशजीनी त्यांचा ओळखीचे श्री. बाबू कार चालवणारे ह्यांनी सुद्धा चांगली माहिती दिली.
सौ. चिन्मयीताई चव्हाण आणि श्री. महेशजी चव्हाण ह्यांनी पाहुणचार खूप खूप चांगला आणि मनापासून केला. सकाळी कांदेपोहे आणि चहा तसेच जेवण अप्रतिम होते.. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार २५ जानेवारी २०२० रोजी सौ. चिन्मयी महेश चव्हाण ह्यांचा घरी पारायण सकाळी सुंदर झाले. जवळ जवळ २० ते २५ स्वामी भक्त हजर होते. घरासमोर श्री स्वामी समर्थ नावाची रांगोळी सुद्धा सुरेख दिसत होती. शनिवारी स्वामी भक्तांना सुट्टी सुद्धा असल्यामुळे गर्दी वाढत गेली. अगदी संध्याकाळ साधारण ८ ते ९ वाजेपर्यंत अक्कलकोट स्वामी भक्त त्यांचा दर्शनाला त्यांचा घरी येत होते. घर एकदम स्वच्छ होते. अर्थात मी नेहमी म्हणतो परायणाच्यावेळी "स्वच्छता जिथे असे, लक्ष्मी तिथे वसे, रोगराई तिथे नसे आणि आरोग्य तिथे असे.".
त्यानंतर त्याच दिवशीही दुपारी ३,३० ते ८.०० सौ. कादंबरीताई नाईक ह्यांचा घरी अक्कलकोट स्वामींचे पारायण झाले. त्यांचा घरीही खूप स्वामी भक्त आले. नामसम्रानच्यावेळी काही स्वामी भक्त तर डोळे बंद करून बेफान होऊन जप करत होते.
तिन्ही ठिकाणी पारायण चांगले झाले. महप्रसाद सुधा अप्रतिम होत. चला सुरवात अक्कलकोट स्वामींच्या आशीर्वादामुळे उत्तम झाली. २ स्वामी भक्तांनीच तर "पुढच्यावेळेस याल तर आमचा घरी पारायण करा" असे आमंत्रणं सुद्धा दिलेत...
बहारीन मध्ये स्वामी भक्त श्री. सुशील कुलकर्णी ह्यांचा कडे अक्कलकोट स्वामींचा पादुका आहेत. परंतु वेळेचा अभावी त्यांचा कडे जात आले नाही. पुढच्यावेळेस जेव्हा योग येईल तेव्हा नक्कीच जाईन त्यांचा घरी आणि पारायण सुद्धा करिन.
बहारीन मध्ये एवढे अक्कलकोट स्वामी भक्त आहेत आणि लवकरच पूर्ण बहरीन अक्कलकोट स्वामीमय होईल अशी अक्कलकोट स्वामी चरणी मी प्रार्थना करतो.
बहरींनचा स्वामी भक्तांना मी २ पुस्तके दिली आहे एक म्हणजे श्री. संजय नारायण वेंगुर्लेकर लिखित अक्कलकोट आणि दुसरे म्हणजे पार्वती रोझेन स्पिकबर्ग लिखित अग्निहोत्र दिलेले आहे. ते जास्तीत जास्त भक्तांनी वाचावे हि नम्र विनंती.